राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor
Rajhans Prakashan
0
राजहंसी मोहोर हे पुण्यातील अग्रगण्य प्रकाशन संस्था राजहंस प्रकाशनाचे अधिकृत मराठी पॉडकास्ट आहे. सात दशकांचा साहित्यिक वारसा लाभलेल्या या उपक्रमात राजहंसी पुस्तकांची ऑडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा यांचा समावेश आहे. दर बुधवारी नवीन भाग प्रसारित होतो, ज्यामध्ये नवे पुस्तक आणि नवा लेखक सादर केला जातो.
Jaksot
-
शहाणा असशील तर लिहू नकोस...| Lokesh Shevde | Rajhans Prakashan 15.04.2026 8minलोकेश शेवडे लिखित शहाणा असशील तर लिहू नकोस हे पुस्तक नुकतंच राजहंसने प्रकाशित केलंय. या पुस्तकातील एका लेखातील निवडक भागाचं वाचन करताहेत अपर्णा जोग. पुस्तक खरेदीची लिंक - https://www.rajhansprakashan.com/product-details/shahana-asashil-tar-lihu-nakos-shahanae-asashal-tara Book - Shahana Asshil Tar Lihu Nakos... Author - Lokesh Shevde Narration - Aparna Joag Cover Design - Veerendra Tikhe Executive Producer - Niranjan Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
-
सुमन कल्याणपूर: सात्विक सुरांचा नंदादीप | Suman Kalyanpur | New Marathi Book 04.03.2026 34minस्त्रीत्व कसं असेल, तिच्या अलवार मनाला काय भावत असेल, तिचं हळुवार व्यक्त होणं कसं असेल, तर सुमनताईंसारखं..! प्रेमळ, समजूतदार, हळवं, शांत, समर्पित... शांतपणे तेवणारा नंदादीपच जणू. कोवळ्या नाजूक फुलांचा मंद सुगंध, पावसाची हलकीशी सर, झाडाची कोवळी पालवी, पानांवरील निर्मळ दवबिंदू किती उपमा द्याव्यात या आवाजाच्या व्यक्तिमत्त्वाला? त्यानं आपलं असं एक स्थान निर्माण केलं. पौर्णिमेच्या शीतल चांदण्याला जर स्वतःचा आवाज मिळाला तर किती मधुर असेल तो? तरल, सुरेल, वत्सल, शुद्ध उच्चारांचं लेणं लाभलेला, उत्तम पल्ला नि फिरत असणारा, तरी अत्यंत भावपूर्ण... सुमन कल्याणपूर यांच्या मराठी व हिंदी गाण्यातल्या सांगीतिक वैशिष्ट्यांचा स्मरणीय आढावा आणि त्यांच्या निकोप आवाजातल्या निवडक २५ गाण्यांचं रसग्रहण, प्रसिद्ध गायिका अपर्णा संत यांच्या आवाजात... Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/suman-kalyanpur-samana-kalyanaepara Book: Suman Kalyanpur Author: Aparna Sant Podcast Host: Shirish Sahasrabuddhe Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Mohini Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #marathipodcast #rajhansimohor #rajhansprakashan #rajubaviskar Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
-
Done That Been There | Meghana Pethe | Marathi Book Narration 25.02.2026 15minBook Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/done-that-been-there-da-thata-bthaara हे भुयार आहे की विवर हे समजत नाही. आणि दिवा दाखवायला कुणी नाही. आठवणींच्या गच्च रानात हरवल्यावर हाक द्यायला कुणी नाही. मडक्यांची पुन्हा माती होताना कुणीच सोबत नाही. आणि या वाहत्या नदीच्या पाण्याचा ठाव घेता येत नाही. हे नीट उमगल्यावर माणूस स्वतःशी बोलू लागतो का ? आणि हे असं स्वतःशी बोलणंच असतं का लिहिणं वगैरे ? लिहिणाऱ्या समोर ठाकणारे असे अनेक प्रश्न.. ज्यांची उत्तरं लिहिणाऱ्याला लिहिता लिहिताच उमगत जातात. दुसरे आपल्याला समजतात, तितके मूर्ख आपण खचितच नसतो. पण आपण स्वतःला समजतो, तितके शहाणेही आपण क्वचितच असतो! लिहिताना आणि लिहिल्यावर काय काय झालं, यातली तथ्यं मी मांडताना हे शक्य आहे, की 'या तथ्यांच्या जबड्यातून निसटून, सत्य कदाचित् दूर कुठेतरी एकटंच बागडत असेल!'...डंदॅट् बींदेअर् या आपल्या नवीन पुस्तकातील काही निवडक भाग सादर करताहेत लेखिका मेघना पेठे Book - Done That Been There Author and Publisher - Meghana Pethe Distributor - Rajhans Prakashan Recording - AK Studio Executive Producer: Niranjan Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #marathipodcast #rajhansimohor #rajhansprakashan #rajubaviskar Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
-
धुळाक्षरे ते शल्यकौशल्य | Dr Dnyaneshwar Dusane | Marathi Book Review 04.02.2026 26minBook link: https://www.rajhansprakashan.com/product-details/dhulakshare-te-shalyakaushalya-thhalikashhara-ta-shalyakashalya त्याच्याजवळ ना पैसा होता, ना कुणाचे पाठबळ. हातावरचे पोट असलेले आईवडील अन् गरिबीच्या उन्हात उभे राहिलेले घर. पण तो फक्त नावापुरता 'ज्ञानेश्वर' नव्हता. आपल्या बुद्धिमत्तेला त्याने चिकाटीची धार चढवली. विलक्षण जिद्द अन् अभ्यासाच्या सातत्यातून तो प्रख्यात शल्यविशारद झाला. हा अवघड वळणाचा प्रवास सांगणारी एका समर्पित सर्जनची संघर्षकहाणी... Book: Dhulakshare Te Shalyakaushalya Author: Dr. Dyaneshwar Dusane Podcast Host: Niranjan Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Mohini Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #marathipodcast #rajhansimohor #rajhansprakashan #rajubaviskar Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
-
हरित हिंदुत्व | Dileep Kulkarni | Rajhans Prakashan 21.01.2026 16minहिंदुत्वा'ची दोन मूलभूत वैशिष्ट्यं म्हणजे आध्यात्मिक जीवनदृष्टी, आणि त्यातून घडणारी संयमित उपभोगाची जीवनशैली. तसं जगणं, म्हणजेच खऱ्या अर्थानं 'धर्मपालन'; कारण, त्यातूनच पर्यावरणाची 'धारणा' सुनिश्चित होऊ शकते. पश्चिमी विचार-आचारांच्या प्रभावामुळे आपणच त्याला सोडचिट्ठी दिलेली आहे! त्यामुळे, साऱ्या जगाप्रमाणेच आपल्यालाही पर्यावरणाच्या विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशा काळात, सध्याचं भरकटलेलं हिंदुत्व नाकारत, निसर्गरक्षणासाठी उपयोगी ठरणाऱ्या मूळ हिंदुत्वाची युगानुकूल मांडणी करणारं, आणि त्याच्या आचरणाचा आग्रह धरणारं हे पुस्तक : स्वतः तसं जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका अभ्यासू आणि तळमळीच्या कार्यकर्त्यानं लिहिलेलं...दिलीप कुलकर्णी लिखित हरित हिंदुत्व या पुस्तकातील निवडक भाग आपण ऐकणार आहोत ओंकार थोरात यांच्या आवाजात. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
-
वंचित वर्गाचा अस्वस्थ करणारा उद्गार | काळ्यानिळ्या रेषा | Raju Baviskar | Rajhans Prakashan 14.01.2026 37min‘काळ्यानिळ्या रेषा' हे केवळ एका चित्रकाराचे आत्मकथन नाही, तर हा समाजातील एका वंचित वर्गाचा अस्वस्थ करणारा उद्गार आहे. राजू बाविस्करांनी आधी आपल्या अभिव्यक्तीसाठी रेषा वापरली, रंग वापरले आणि आता आपल्या अनुभवांना शब्दांमधून वाट करून दिली आहे. आपल्या वाट्याला आलेले गावकुसाबाहेरचे उपेक्षेचे जगणे आणि झगडणे समंजसपणे उलगडत ते वाचकांना आपल्या चित्रांच्या दुखऱ्या मुळांपर्यंत घेऊन जातात. एका सर्जनाची मुळे दुसऱ्या माध्यमातील सर्जनप्रक्रियेत गवसणे हा अत्यंत विरळा असा अनुभव त्यांना आला. व्यक्तिचित्रणाच्या अंगाने जाणाऱ्या त्यांच्या काळ्यानिळ्या रेषा या आत्मकथनातून आपल्यालाही त्यामुळे अंतर्मुख करणारा अस्सल वाचनानुभव मिळतो. #marathipodcast #rajhansimohor Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
-
नाट्यभारती: ७० वर्षांचा अनोखा प्रवास | Rajhans Prakashan | Natyabharati 24.12.2025 35minनाटक म्हणजे अल्प रंगमंचसज्जा, सशक्त कथानक अन् सामर्थ्यवान भावदर्शी अभिनय यांच्या बळावर प्रेक्षकांना स्वतःचा, आसपासचा आणि व्यापक समाजाचा गंभीर विचार करायला लावणारं एक महत्त्वाचं माध्यम आहे, हे या नाट्यसंस्थेनं आपल्या नाट्यकार्यातून दाखवून दिलं. बृहन्महाराष्ट्रातील मराठी जनांची नाळ आजही मराठी भाषा आणि महाराष्ट्रीय संस्कृतीशी जोडलेली आहे, ही गोष्ट अधोरेखित करणारा इंदौरच्या रंगकर्मीचा सात दशकांचा सर्जन प्रयोग 'नाट्यभारती'. सुनीता लोहोकरे लिखित नाट्यभारती हे पुस्तक राजहंस प्रकाशनाने नुकतेच प्रकाशित केलं आहे. यानिमित्तानं या सुनीता लोहोकरे यांनी ज्येष्ठ रंगकर्मी श्रीराम जोग यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
-
मेड इन चायना | Girish Kuber | Marathi Book Narration 10.12.2025 10minBook Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/made-in-china-mada-ina-cayanaआपला शेजार आपल्याला बदलता येत नाही. गेली अनेक शतकं आपला शेजारी असलेल्या चीनबरोबरचे आपले संबंध विलक्षण गुंतागुंतीचे. विशेषत: माओंच्या कारकिर्दीत झालेल्या १९६२ च्या युद्धानंतर हे संबंध चांगलेच ताणले गेले. वास्तविक आजचा चीन आणि माओंचा चीन यात जमीन - अस्मानाचा फरक. साम्यवादाचं नाव लावणाऱ्या चीनमध्ये आज प्रत्यक्षात प्रारूप आहे ‘नियंत्रित-भांडवलशाही’चं. चीन जितका आधुनिक, तितकाच ऐतिहासिकही. आधुनिकतेच्या महामार्गावर वेगाने पुढे जाताना एखाद्या वळणावर आपली प्राचीनता सोडून द्यावी, असं चीनच्या कोणत्याही सत्ताधीशाला वाटलेलं नाही, मग ते माओ असोत, डेंग असोत वा आजचे क्षी जिनपिंग. हे असे विसंवाद वागवत वागवत पुढे जाणं हे चीनच्या रक्तातच असावं. आजही भारताबरोबरचा संघर्ष असेल वा अमेरिकेशी स्पर्धा- चिनी सत्ताधीश आपली धोरणं ठरवताना इतिहासात दडलेल्या सूत्रांचा आधार घेत असतात. हे चकित करणारं विलक्षण चिनी प्रारूप समजावून देणारं पुस्तक - मेड इन चायना Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
-
ऑक्सिजन: पर्यावरणाच्या समस्येला भिडणारी भविष्यवेधी कादंबरी 03.12.2025 11minBook Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/oxygen-oikasajana पृथ्वीवरच्या वातावरणात ऑक्सिजनचं प्रमाण असतं वीस टक्के. हे प्रमाण कायम राखण्यात वनस्पतींचा वाटा महत्त्वाचा. हे प्रमाण घसरू लागलं ! दहा टक्क्यांहूनही खाली घसरलं! आणि जगात एकच हाहाकार माजला. या समस्येवरचा तोडगा काय? तो शोधताना जगातील राष्ट्र दोन गटांत विभागली गेली. पंचेचाळीस प्रगत राष्ट्रांचा तोडगा होता झाडांविना जीवन. तर वृक्षसंपदेचं रक्षण करणारा राष्ट्रसमूह म्हणत होता, 'झाडांच्या सहवासात जीवन.' या झगड्यात भारताचं धोरण काय होतं?आजची काल्पनिका उद्याचे वास्तव ठरल्याची अनेक उदाहरणे विज्ञानाच्या क्षेत्रात सापडतात. या कादंबरीतून मांडलेली कल्पनाही भविष्यातील भयकारी वास्तव ठरेल का? पर्यावरणाच्या व्यामिश्र समस्येशी थेट भिडणारी भविष्यवेधी ही कादंबरी! Book: Oxygen Author: Dr Ranjan Garge Narrator: Aparna Joag Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Mohini Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #bookreading #marathipodcast #rajhansprakashan Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
-
दुबई काल आणि आज | Dubai | Marathi Book Review 05.11.2025 15minदुबई म्हणजे वाळवंटात निर्मिलेले जणू नंदनवनच ! जिद्द, मेहनत आणि दुर्दम्य आशावाद या त्रिगुणांच्या जोरावर अरबी माणसाने सर्वस्वी प्रतिकूल परिस्थितीवर मात केली. पाण्याच्या चार घोटांसाठी वणवण करणारा हा अरब आज सेंट्रली एअरकंडिशन घरातील सुखासीन आयुष्य जगतोय. हा बदल 'याचि देही याचि डोळा' अनुभवणाऱ्या मेघना अशोक वर्तक. १९७६ ते २०२५ या कालखंडात मेघनाताईंनी आपले पती श्री. अशोक वर्तक यांच्याबरोबर दुबईत वास्तव्य केले. मेघनाताईंच्या नजरेला बदलणारी दुबई जशी भावली, तशी त्यांनी ती शब्दांकित केली. दुबईच्या जीवनशैलीच्या प्रत्येक वैशिष्ट्यपूर्ण कंगोऱ्याचे कालानुरूप बदलते रंग आपल्याला आलेल्या अनुभवांसहित त्यांनी रेखाटले आहेत. आणि म्हणूनच स्थानिक वाचक दुबईच्या भूतवर्तमानाशी समरस होतील, त्यांना ही आपलीच गोष्ट वाटेल. दुबईचे यथार्थ दर्शन घडवणारे आणि दुबई-दर्शनाची ओढ लावणारे.. Book: Dubai Kal ani Aaj Author: Meghana Ashok Vartak Narrator: Aparna Joag Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Mohini Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #dubai #marathipodcast #rajhansprakashan Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
-
एका स्थापत्य अभियंत्याची कर्तृत्वगाथा | पाषाणाचे पाझर | Rajhans Prakashan 29.10.2025 38minसत्य हे कल्पनेपेक्षाही अद्भूत असतं याचा प्रत्यय देणारं विलक्षण आत्मचरित्र म्हणजे विवेक गाडगीळ लिखित पाषाणाचे पाझर. हे चरित्र म्हणजे जवळजवळ पाऊणशे वर्षांच्या काळाचे कोलाज आहे! संगमनेरसारख्या छोट्या गावातलं बालपण, नंतर शिक्षणाच्या निमित्तानं गावाबाहेरचं वास्तव्य तर सिव्हिल इंजीनिअर झाल्यावर भारतभर आणि भारताबाहेरही केलेली मुशाफिरी या पुस्तकात आहे. पण हे पुस्तक म्हणजे केवळ अनुभवांचा पट किंवा डायरी लिहिल्यासारखी तारखांची आणि प्रमुख घटनांची नोंद नाही. तर त्यात नाट्य आहे. कुमारवयातलं प्रेम, घरच्यांचा विरोध ते स्वतःला सिद्ध करत घरच्यांच्या संमतीनं झालेला आंतरजातीय प्रेमविवाह आहे. तमिळनाडू-पश्चिम बंगालपासून ते अबूधाबी-इराक आणि नेपाळमध्ये साकारलेल्या महाकाय प्रकल्प उभारणीतलं योगदान आहे, युद्धजन्य परिस्थिती आहे, जगण्या-मरण्याचे प्रसंग आहेत, मुंबईतल्या लँडमाफियांपासून भ्रष्ट प्रशासनापर्यंत अनेक पातळ्यांवर केलेला संघर्ष आहे. पाषाणाचे पाझरमधून एखाद्या चित्रपटाला किंवा वेब सिरीजला शोभेल अशी दीर्घ कथाच विवेक गाडगीळ स्वतःच्या जगण्यातून उलगडतात. या आगळ्यावेगळ्या ग्रंथाविषयी जाणून घेऊया या एपिसोडमधून. Book link: https://www.rajhansprakashan.com/product-details/pashanache-pazar-book Book: Pashanache Pazar Author: Vivek Gadgil Podcast Host: Niranjan Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Mohini Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #vivekgadgil #pashanachepazar #rajhansprakashan Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
-
अलौकिक अंटार्क्टिका | Antarctica Travel Story | Rajhans Prakashan 15.10.2025 13minBook Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/antarctia-atarakataka निसर्गाविषयीचे अपार कुतूहल आणि साहस करण्याची मनाची तयारी या बळावर कोल्हापुरातील एक सुविद्य मध्यमवर्गीय दांपत्य शिडाच्या बोटीतून अंटार्क्टिका मोहिमेवर जाते. एके काळी समुद्रबंदीच्या बेडीने आपल्या समाजाला जखडून ठेवले होते, याचे आज आश्चर्य वाटेल. तो काळ आता मागे पडला आहे. मात्र डॉ. गायत्री आणि डॉ. गुरुदास हर्षे यांनी इतरही कितीतरी सांकेतिक, पारंपरिक निर्बंधांच्या बेड्यांतून स्वतःला मोकळे करून घेतले आहे, हे या लेखनातून ठळकपणे जाणवते. त्यांची साहसकथा वाचताना त्या रोमांचक थराराचा अनुभव वाचकांनाही येतोच; पण निसर्गविज्ञान, इतिहास, भूगोल यांविषयीचे संदर्भआपले आकलन अधिक समृद्ध करतात. त्यामुळेच हा केवळ वैयक्तिक अनुभव न राहता एक प्रेरक, मार्गदर्शक ठेवाही ठरतो. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
-
एक होता कार्व्हर | Veena Gavankar | Rajhans Prakashan 08.10.2025 8minEk Hota Carver Book Link - https://www.rajhansprakashan.com/product-details/ek-hota-carver-eka-hata-karavahara-dalkasa-aavatata जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर, वीणा गवाणकर आणि राजहंस प्रकाशन यांचं नातं अद्वैत आहे. वीणाताईंच्या अभ्यासू लेखणीतनं साकारलेल्या एक होता कार्व्हर या चरित्रानं मराठी साहित्यात इतिहास रचला. वीणाताईंचं कार्व्हर वाचलं नाही असा रसिक वाचक मिळणं अवघड. १९८१ साली प्रकाशित झालेल्या पहिल्या आवृत्तीपासून प्रत्येक पिढीवर कार्व्हरचं गारूड कायम आहे. ज्यांनी कार्व्हर पूर्वीच वाचलंय त्यांच्यासाठी आणि कार्व्हर लवकरच हाती घेणार आहेत अशा नवीन पिढीसाठीही एक होता कार्व्हरमधला निवडक भाग आता आपण ऐकणार आहोत अपर्णा जोग यांच्या आवाजात. Book: Ek Hota Carver Author: Veena Gavankar Book Narration: Aparna Joag Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Mohini Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #ekhotacarver #marathibookreview #veenagavankar Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
-
अफाट विश्वाचा सुबोध परिचय | Dr Girish Pimple | Rajhans Prakashan 01.10.2025 37minआकाश संपते, तिथे सुरू होते अथांग ‘अंतराळ’. या अंतराळात पसरले आहे आपले अफाट विश्व. कोट्यवधी दीर्घिका, अब्जावधी ग्रह-तारे न्युट्रॉन तारे, क्वेसार, कृष्णविवरे अशा अनेक घटकांनी बनलेले हे विश्व. आपण कल्पनाही करू शकणार नाही, अशा चमत्कारांनी अन् घटनांनी भरलेले हे विश्व. या अनंत विश्वांचा वेध घेण्याचा अथक प्रयत्न जगभरचे खगोलशास्त्रज्ञ पिढ्यानपिढ्या करत आहेत. लहानथोरांच्या मनात एकाच वेळी कुतूहल अन् जिज्ञासा निर्माण करणार्या आणि त्याचवेळी त्यांना अचंबितही करणार्या या विश्वाचा सुबोध परिचय करून देण्यासाठी सुप्रसिद्ध खगोलतज्ज्ञ गिरीश पिंपळे यांनी रोखलेली दुर्बीण म्हणजे - ओळख आपल्या विश्वाची हे पुस्तक. Book link: https://www.rajhansprakashan.com/product-details/olakh-aplya-vishvachiee-olikha-aapalya-vashavaca Book: Olakh Aplya Vishwachi Author: Dr Girish Pimple Podcast Host: Niranjan Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Mohini Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
-
घुमक्कडी: कविता महाजन यांचे अखेरचे पुस्तक | Rajhans Prakashan | Marathi Book Narration 24.09.2025 7minGhumakkadi Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/ghumakkadi कविता महाजन यांचे 'घुमक्कडी' हे अनोखे पुस्तक नुकतेच राजहंस प्रकाशनाने वाचकांच्या भेटीस आणले आहे. 'ब्र', भिन्न, 'मृगजळीचा मासा' , 'ग्राफिटी वॉल', 'ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम' , 'समुद्रच आहे एक विशाल जाळं' या सारखी गाजलेली पुस्तके कविता यांनी राजहंससाठी लिहिली. 'घुमक्कडी' या पुस्तकात भटकंती आणि त्या-त्या परिसरातील उत्पत्तीकथा-लोककथा यांचा समावेश आहे. अचंबित करणाऱ्या माहितीने भरलेले लेख आहेत. कविता महाजन यांचे हे शेवटचे पुस्तक. यातला पाऊस आणि अश्रू हा लेख आता आपण ऐकणार आहोत अपर्णा जोग यांच्या आवाजात.. Book: Ghumakkadi Author: Kavita Mahajan Narration: Aparna Joag Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Niranjan Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #mialladiyakhan #marathibookreview #marathipodcast Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
-
विश्वास पाटील यांची वास्तवदर्शी महागाथा | Lust for Lalbaug | Vishwas Patil 17.09.2025 15minविश्वास पाटील यांच्या राजहंसी पुस्तकांची लिंक - https://www.rajhansprakashan.com/authors-details/vishwas-patil-vashavasa-patal आजचा पॉडकास्ट हा खास आहे. कारण ज्येष्ठ साहित्यिक, राजहंसी लेखक, पानिपतकार विश्वास पाटील यांची साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. राजहंस परिवारातर्फे त्यांचं मनापासून अभिनंदन! यानिमित्तानं त्यांच्या लस्ट फॉर लालबाग या दीर्घ कादंबरीतील एका प्रसंगाचं अभिवाचन सादर करताहेत अभिनेते नचिकेत देवस्थळी. तर लालबाग, परळ, गिरणगावात घडणाऱ्या या कादंबरीच्या निर्मिती प्रक्रियेतील काही आठवणी सांगताहेत राजहंस प्रकाशनाचे संचालक संपादक डॉ. सदानंद बोरसे. राजहंस प्रकाशनाच्या इंद्रधनुषी साहित्य योजनेअंतर्गत विश्वास पाटील यांच्या सर्व राजहंसी कलाकृती २५ टक्के सवलतीमध्ये उपलब्ध आहेत. Book: Lust for Lalbaug Author: Vishwas Patil Narration: Nachiket Devasthali Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Niranjan Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #vishwaspatil #marathipodcast #rajhansimohor Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
-
..आणि वयाच्या ८९ व्या वर्षी अल्लादियाखां यांनी गाजवली संगीत मैफल 10.09.2025 17minस्वातंत्र्यपूर्व काळात १९४४ साली मुंबईत विक्रमादित्य संगीत परिषद ही भव्य सांगितीक मैफलीचं आयोजन करण्यात आलं होतं. याच्या अध्यक्षस्थानी होते न्यायमूर्ती जयकर. तर या मैफलीची सांगता झालेली उस्ताद अल्लादियाखां यांच्या गायनानं. वास्तविक तेव्हा अल्लादियाखां हे ८९ वर्षांचे होते. त्यामुळे सुरुवातीला त्यांनी या परिषदेत सहभागी होण्यासाठी नम्रपणे नकार दिला होता. पण स्वतः बॅरिस्टर जयकर यांनी आग्रह केल्यानं त्यांनी हे निमंत्रण स्वीकारलं होतं. या संपूर्ण प्रसंगाचं चित्रण मी अश्विनी भिडे देशपांडे लिखित मी अल्लादियाखां या चरित्राच्या पहिल्या प्रकरणात आहे. याचं अभिवाचन केलंय अभिनेता नचिकेत देवस्थळी यांनी. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
-
एक अनघड प्रवास उलगडणारं फकिरी | Fakiri | Datta Bargaje | Rajhans Prakashan 03.09.2025 27minखरं तर हा सर्वसामान्य माणूस. चारचौघांसारखंच आयुष्य गेलं असतं त्याचं. बालपण, शिक्षण, मग नोकरी अन् पोटासाठीची पायपीट. पण या प्रवासात त्याला मिळाली सेवेची प्रेरणा, करुणेचा वसा. ती प्रेरणा, तो वसा घेऊन पुढे पीडितांसाठी तो काम करत राहिला. कुठेही थांबला नाही, दमला-भागला नाही, स्वत:च्या सुखाचा विचारही त्याच्या मनात आला नाही. तो निरंतर चालत राहिला. पडल्या-झडलेल्या आणि तुटक्या-फाटक्या माणसाला अडचणीतून मार्ग दाखवण्यासाठी दिशाहीन वा नाउमेद झालेल्या तरुणाईला पुढे चालावेसे वाटेल, मार्ग निघत जाईल, जीवन बदलत जाईल असा पुढील पिढ्यांना दिलासा मिळेल या विश्वासातून केलेला अनघड प्रवास. Book: Fakiri Author: Datta Bargaje Podcast Host: Mohini Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Niranjan Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #fakiri #marathibookreview #marathipodcast Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
-
हाडाच्या शिक्षणतज्ज्ञाने शब्दबद्ध केलेले 'माझे शाळेतले प्रयोग' | Smita Gaud | Rajhans Prakashan 27.08.2025 41minगडहिंग्लज तालुक्यातील नांगनूर या छोट्याशा गावातील ‘विद्या मंदिर’ ही प्रयोगांची पहिली पायरी. मुलांमध्ये दडलेल्या उपजत क्षमतांचा विकास घडवणे हे या सा-या प्रयोगांचे लक्ष्य. वर्गात प्रत्यक्ष घडलेली अध्ययन-अध्यापन प्रकिया हा या प्रयोगविषयाचा गाभा. शिकणे आनंददायी व्हावे, शिक्षणातील साचलेपण जाऊन ते निर्झरासारखे प्रवाही व्हावे, या उद्दिष्टाने झपाटलेल्या एका शिक्षणतज्ज्ञाने रेखाटलेला हा अनोखा प्रवास. विद्यार्थी, पालक, सहयोगी शिक्षक आणि या क्षेत्रात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे गुंतलेल्या अनेक व्यक्ती यांच्या एकत्रित प्रयत्नांमधून साकारलेले - प्राथमिक शाळेतील शिक्षिका ते शिक्षणप्रशासनात सहभागी झालेल्या शिक्षणाधिकारी अशा विविध भूमिकांमधून भरीव योगदान देणा-या हाडाच्या शिक्षणतज्ज्ञाने शब्दबद्ध केलेले - माझे शाळेतले प्रयोग. Book: Maze Shaletle Prayog Author: Smita Gaud Podcast Host: Dr Priya Nigojkar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Niranjan Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #mialladiyakhan #marathibookreview #marathipodcast Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
-
मी...अल्लादियाखां | Mi Alladiyakhan | Ashwini Bhide Deshpande | Marathi Book Podcast 13.08.2025 39minमरहूम उस्ताद अल्लादिया खांसाहेब...जयपूर-अत्रौली घराण्याच्या विद्यमान गायकीचे उद्गाते. जणू ‘गायनाचे गौरीशंकर'! त्यांच्या गायकीच्या आजच्या घडीला कार्यरत वारसदारांपैकी डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे सांगत आहेत त्यांची चरितकहाणी. ख्यालगायनाच्या पद्धतीनुसार ‘रागबढत' किंवा ‘उपज' या अंगाने विस्तारत साकारलेली खांसाहेबांची ही जीवनकथा. त्यातून वाचकापुढे उलगडत जातं कधी सौंदर्यपूर्ण, प्रमाणबध्द स्थापत्यासारखं खांसाहेबांचं व्यक्तिमत्त्व, कधी त्यांच्या पारिवारिक आणि गुरुशिष्य नातेसंबंधांचं नाजूक, जरतारी विणकाम. विविध प्रसंगांतून उजागर होतात खांसाहेबांच्या व्यक्तिमत्त्वातल्या मनोहारी रंगछटा. एखाद्या कादंबरीसारख्या सुरस, रोचक घटनांनी भरलेलं हे खांसाहेबांचं ‘ललित चरित्र' म्हणजे रसिक वाचकांना तसेच अभिजात संगीताच्या साधकांना लाभलेली शब्दमैफिलीची पर्वणी. मी अल्लादियाखां या पुस्तकाच्या लेखिका अश्विनी भिडे देशपांडे यांच्याशी संवाद साधताहेत ज्येष्ठ पत्रकार मुकुंद संगोराम Book: Mi Alladiyakhan Author: Ashwini Bhide Deshpande Podcast Host: Mukund Sangoram Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Niranjan Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #mialladiyakhan #marathibookreview #marathipodcast Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Suosittu maassa
Tämä podcast esiintyy myös näiden maiden podcast-listoilla.